Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुख्यमंत्र्यांकडून सत्तेचा गैरवापर? ; पत्नीच्या बँकेत वळवली पोलीस कर्मचाऱ्यांची बँक खाती

Devendra Fadnavis with wife Amruta PTI

 

मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा गैरवापर करत महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची बँक खाती राष्ट्रीय बँकांमधून अॅक्सिस बॅंकेत वळवल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायलयात दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची पत्नी अॅक्सिस बॅंकत मोठ्या हुद्द्यावर कार्यरत असल्यामुळे निर्णय घेण्यात आल्याचे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

 

मोहनीष जबलपुरे यांनी मुंबई उच्च न्यायलायात मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्य सरकारविरोधात याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी राज्य सरकारने ११ मे २०१७ रोजी एक परिपत्रक काढून राज्यातील सर्व पोलिसांची बँक खाती तसेच संजय गांधी निराधार आवास योजनेच्या लाभार्थ्यांची खाती खासगी बँकेमध्ये उघडण्यास सांगितल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत अॅक्सिस बॅंकेला मुद्दाम झुकते माप दिले. या निर्णयामुळे राष्ट्रीय बँकांना फटका बसला असून त्यांना तोटा सहन करावा लागत आहे.

Exit mobile version