Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किरकोळ कारणावरून दोन कुटुंबात शिवीगाळ व मारहाण

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील पंचशील नगरात किरकोळ कारणावरून दोन कुटुंबामध्ये एकमेकांना शिवीगाळ व मारहाण करत दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील पंचशील नगरात मिलिंद रमेश सुरवाडे आणि शेख अल्ताफ शेख फकीरा हे दोन कुटुंब एक वास्तव्याला आहे. दरम्यान दोन्ही कुटुंबाचा किरकोळ वाद झाला. या वादातून दोघी कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी पहिल्या गटात मिलिंद रमेश सुरवाडे वय-45 यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी असे अल्ताफ उर्फ भुऱ्या शेख फकीरा आणि शेरा उर्फ काली या दोघांवर भुसावळ बाजारपेठ पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शेख अल्ताफ शेख फकीरा (वय-३९ रा. पंचशील नगर भुसावळ) यांनी दिलेले फिर्यादीवरून संशयित आरोपी मिलिंद रमेश सुरवाडे याच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल रोकडे हे करीत आहे.

Exit mobile version