लाच मागणाऱ्या फरार संशयित आरोपीला अटक; लाचलुचपत विभागाची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । धरणगाव पोलिस स्थानकात कार्यरत पोलिस नाईक व अमळनेर येथील रहिवासी विलास बुधा सोनवणे यांच्यावर जळगाव लाच लुचपत विभागाने १९ हजार रूपयांची लाचेच्या मागणीनुसार ८ मार्च २१ रोजी गुन्हा नोंदविला होता. परंतु अनेक दिवसांपासून आरोपी फरार होता. पथकाने त्याला आज शहरातील बहिणाबाई गार्डन येथून अटक केली आहे.

धरणगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक विलास बुधा सोनावणे वय ४३ रा. अमळनेर हा धरणगाव पोलिस स्थानकात कार्यरत आहे. दाखल तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारदार यांना गुन्ह्यांमध्ये फिर्यादी यांना शिक्षा होणार नाही शिक्षेपासून बचाव होईल अशा पद्धतीने कागदपत्रात मदत करून न्यायालयात चार्ज शीट पाठविण्याच्या मोबदल्यात पोलिस नाईक यांनी तक्रारदार यांच्याकडे १९ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानुसार सदर संशयित आरोपी विलास बुधा सोनवणे यांच्यावर १८ मार्च २०२१ रोजी भ्रष्टाचाराचा दाखल झाला. तेव्हापासून संशयित आरोपी सोनवणे हा फरार होता. 

आज गुरूवार २७ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी विलास सोनवणे हा जळगाव शहरातील महापालिकेच्या बहिणाबाई उद्यानजवळ आल्याची माहिती लाचलुचपत विभागाला मिळाली. काही मिनीटात पथकाने उद्यानाजवळू संशयित सोनवणे याला अटक केली.  पुढील तपास पोलिस निरीक्षक नीलेश लोधी हे करीत आहेत. उद्या शुक्रवार रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

 

Protected Content