Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक विकास कार्यशाळा उत्साहात

abhiyatrikikaran

जळगाव प्रतिनिधी । येथील केसीई अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्युत अभियांत्रिकी शाखेतर्फे आयोजित २२ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत प्राध्यपकांसाठी विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचा समारोप नुकताच झाला.

या समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी आणि वक्ते म्हणून अमरावती शासकीय अभियांत्रिकी महाविध्यालयचे वरिष्ठ प्राध्यपक प्रा.व्ही.बी. बिरूलकर, प्रा.जी.ए. धोमने, प्राचार्य के.पी. राणे, प्रा.संजय सुंगंधी, प्रा.के.एम. महाजन उपस्थित होते.

या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी प्रा.जी.ए. धोमने यांनी सर्वे उपस्थित सहभागी प्राध्यापकांना उद्धेशून. “अड्व्हान्सेस इन पॉवर कन्व्हर्टर, कंट्रोल ऑफ रेनेव्हेबल एनर्जी सौरसेस” या विषयावर मार्गदर्शन करताना, पॉवर कॉन्व्हर्टरचे फायदे सांगून एफडीपीचे भविष्यात महत्व सांगितले. यामुळे प्राध्यापकांच्या ज्ञानात भर पडून भविष्यात स्पर्धेच्या दृष्टीकोनातून ज्ञानाचा सागराची अत्यन्त आवश्यकता आहे हे दाखवून दिले.प्रमुख अतिथी आणि वक्ते प्रा.व्ही.बी. बिरूलकर यांनी अपारंपरिक ऊर्जा, महत्व आणि उपयोगिता या विषयी सविस्तर विवेचन केले.

भविष्यात ऊर्जेचे महत्व लक्षात घेता पारंपरिक ऊर्जा स्रोताचा वाढता वापर लक्षात घेता आणि पर्यावरण याविषयी जागरूकता ठेवून ऊर्जा बचत आणि निर्मितीसाठी अपारंपरिक ऊर्जेचे महत्व लक्षात घेतले पाहिजे असे प्रतिपादन प्रा. व्ही. बी. बिरूलकर सरानी या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी सांगितले.पंधरा दिवस चाललेल्या या कार्यशाळेत विषय तंज्ञ म्हणून प्रा.मकरंद बल्लाळ (एन आय टी नागपूर ) प्रा. के व्ही भदाणे (नाशिक), प्रा.के.व्ही. भदाणे (नाशिक), प्रा.डॉ.पी.जे. शाह (एसएसबीटी बांभोरी), डॉ. आर.अरुणमृगन, प्रा. मेहुल पटेल (के. वाय. सोल्युशन पुणे.), प्रा.अजय चांडक , प्रा.डी.एम. सोनजे, प्रा. वसुंधरा महाजन (एस. व्ही. एन. आय. टी. सुरत), प्रा.ए. आर. फडके (विभागप्रमुख – शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव) प्रा.ए.ए. कालगे (विभागप्रमुख -एस. आय.टी. लोणावळा), डॉ. देवदत्ता खोगले(गती जळगाव), इत्यादी सर्व अनुभवी प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले.

या प्राध्यापकांच्या कार्यशाळेच्या दरम्यान एक दिवशीय उद्योगिक सहल म्हणून जैन इर्रीगेशन सिस्टिम येथे आयोजीत करण्यात आली. यात सोलर पॉवर प्लांट , सोलर फोटो होल्टाइक मोडूल निर्मिती प्रक्रिया, बाओमास इलेक्ट्रिक जनरेशन प्लांट , इत्यादी ठिकाणी भेट देऊन गांधी तीर्थविषयी सुद्धा माहिती जाणून घेतली. जैन इर्रीगेशन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी चिन्मय जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यानी या अभ्यास सहलीस मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी प्राध्यापक, प्रा. शफिक अन्सारी (गोदावरी), प्रा. अनुराग देऊळकर (कोपरगाव), प्रा.महाजन (जे. टी. महाजन अभियांत्रिकी,फैजपूर )यांनी मनोगत व्यक्त केले. संपूर्ण कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा.राहुल पाटील, प्रा.सचिन नाथ, प्रा. उमाकांत कोठोके, प्रा. प्रवीण भंगाळे, प्रा.के.एम. महाजन (विभागप्रमुख विद्युत शाखा) प्रा.चैत्रा पानट, प्रा.शीतल महाजन, प्रा.संजय सुगंधी, प्रा.सुशांत सनान्से, प्रा.आर.आर. पटेल, तसेच शिक्षकेतर कर्मचारी नरेंद्र पाटील, किशोर राणे, यशवंत पाटील, प्रदीप यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच प्रा. स्वप्नील पाटील, प्रा.मनोज साळुंखे, प्रा.मीनल कोल्हे, प्रा.डॉ. प्रज्ञा विखार यांनीसुद्धा कार्यशाळेसाठी मोलाचे सहकार्य केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रा.चैत्रा पानट आणि प्रा.सुशांत सनान्से यांनी केले.

Exit mobile version