Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अभिषेक पाटील यांनी घेतली अ‍ॅड. निकम यांची सदिच्छा भेट

abhishek patil adv nikam meeting

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या महाआघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची सदिच्छा भेट घेऊन आगामी निवडणुकीबाबत चर्चा केली.

अभिषेक पाटील यांनी आपल्या संपर्क अभियानास प्रारंभ केला असून याला शहरवासियांनी प्रतिसाद दिला आहे. त्यांनी समाजाच्या विविध स्तरांमधील मतदारांशी संपर्क सुरू केला आहे. या अनुषंगाने त्यांनी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची भेट घेऊन आगामी निवडणुकीबाबत चर्चा केली. अभिषेकदादांनी अ‍ॅड. निकम यांचे आशीर्वाद घेतले. पायोनियअर क्लब मित्रमंडळाच्या दुर्गोत्सवात ही भेट झाली. याप्रसंगी अभिषेक पाटील यांच्या हस्ते नवदुर्गेची आरती करण्यात आली. या कार्यक्रमाला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version