Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल नगरपालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षपदाचा अभिमन्यु चौधरी यांनी स्विकारला पदभार

यावल प्रतिनिधी । यावल नगरपालिकेवर पहिल्यांदाच प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रभारी नगराध्यक्षपदी अभिमन्यू चौधरी (हेन्द्री) यांची निवड करण्यात आली असून आज चौधरी यांनी पदाचा पदभार स्विकारला आहे.

यावेळी यावल नगरपालिकेच्या नगराध्यक्षा नौशाद तडवी म्हणाल्या की, प्रहार जनशक्तीचे नेते अनिल चौधरी यांच्या शब्दाला मान राखून आम्ही आमचे सहकारी नगरसेवक तथा विद्यमान उपनगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी यांना प्रभारी नगराध्यक्ष पदासाठी सुत्रे सोपविली आहे. प्रभारी नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी म्हणाले, राज्यमंत्री मंत्री बच्चू कडू, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या आशिर्वादामुळे आज मी नगराध्यक्ष झालो, जेवढे दिवस नगराध्यक्ष पदावर राहील तिथपर्यंत अनिल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली रखडलेल्या विकासकामांना मार्गी लावणार. या दरम्यान नवनिवार्चीत प्रहार पक्षाचे प्रभारी नगराध्यक्ष अभिमन्यु चौधरी यांचे अनिल चौधरी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. दरम्यान, सर्व प्रहार परिवारासाठी हि आनंदाची बातमी असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

या प्रसंगी यावल नगराध्यक्षा नौशाद तडवी, समाजसेवक दिलीप वाणी, माजी नगराध्यक्ष तथा प्रहार जनशक्तीचे यावल शहराध्यक्ष तुकाराम बारी, आदीवासी समाजातील समाजसेवक मुबारक तडवी, अल्पसंख्याक तालूकाध्यक्ष मोहम्मद हकीम, कैलास चौधरी, मनोज करणकाळ, प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक शहराध्यक्ष राहुल कचरे, राजू शेख, सागर चौधरी, आयुष वाणी, खन्ना माळी, आसिफ खान व सर्व प्रहारचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

 

Exit mobile version