Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यापीठासमाेर अभाविपचा विद्यार्थी आक्रोश मोर्चा (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक विधानसभेत पारित केल्याच्या निषेधार्थ बुधवारी ३० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वार येथून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.

 

याबाबत माहिती अशी की, विधानसभेत २८ डिसेंबर रोजी विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक पारित करण्यात आले. यामध्ये विद्यापीठाच्या स्वायतत्तेवर घाला घालत स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी विद्यापीठ कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र

शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व शासकीय विद्यापीठाचे कुलपती असणारे राज्यपाल हे देखील कुलगुरूंची थेट नियुक्ती करू शकणार नाही. यापुढे कुलगुरू निवड राज्यशासनाने सुचवलेल्या दोन नावांमधूनच राज्यपाल करावी लागेल. राज्य शासन पूर्णपणे कुलपती अधिकारात हस्तक्षेप करीत आहे. विद्यापीठामध्ये कुलपती पदावर प्र. कुलपती म्हणून एक नवीन पद निर्माण करण्यात येणार असून त्यापदी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यावरून विद्यापीठांच्या स्वायतत्तेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न राज्यशासन करीत आहे. यावरून स्पष्टपणे राजकीय पक्ष, नेते यांचा अवाजवी हस्तक्षेप निर्णय प्रक्रियेत वाढत असल्याचे दिसून येत आहे.

 

यामुळे विद्यापीठांची गुणवत्ता पूर्णपणे ढासळण्याची शक्यता असल्याने विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे राजकीयकरण या निर्णयामुळे होईल. तरी विद्यार्थी हिताचा विचार करून हा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी अभाविप वतीने करण्यात आले आहे. निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Exit mobile version