Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या मुली ! 

औरंगाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | टीईटी घोटाळ्यात माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. तर सत्तार यांनी याचा इन्कार केला आहे.

टीईटी घोटाळ्यात परीक्षा परिषदेकडून गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये तब्बल ७ हजार ८७४ विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्यांना टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरूपी मनाई करण्यात आली आहे. यातील लक्षणीय बाब म्हणजे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या शिक्षिका असणार्‍या हिना आणि उजमा या दोन्ही मुलींचेही यात नाव आहे. सायबर पोलीस आणि परीक्षा परिषद यांनी जी यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये या दोन्ही मुलींचा समावेश आहे.

तर अब्दुल सत्तार यांनी या प्रकरणात आपल्या मुलींचा सहभाग असल्याचा इन्कार केला आहे. हा आमच्या बदनामीचा मोठा कट असून यात माझ्या मुली सहभागी नसल्याचा ते म्हणाले. जर त्या सहभागी असतील तर खुशाल कारवाई करा असेही ते म्हणाले.

Exit mobile version