Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एमआयडीसीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी मधील जी-सेक्टर परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळून नेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी समोर आली. अखेर या घटनेबाबत रविवार ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या जी-सेक्टर मध्ये एक कुटुंब वास्तव्याला आहे. यात पीडित १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी देखील राहत आहे. शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास पीडित मुलगी ही मैत्रिणीकडे जात असल्याचे पालकांना सांगून घरातून बाहेर गेली. नंतर तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फुस लावून पळून नेले, अशी तक्रार तिच्या नातेवाईकांनी दिली. दरम्यान तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु तिच्याबाबत कोणतीही माहिती न मिळाल्याने तिच्या कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार रविवारी ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी हे करीत आहे.

Exit mobile version