Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना गुरूवार ११ एप्रिल रोजी सकाळी ४ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वषीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान, गुरूवार ११ एप्रिल रोजीच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना पहाटे ४ वाजता उघडकीला आले. त्यांच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय भोई हे करीत आहे.

Exit mobile version