नशीराबाद येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

नशीराबाद गावातील १६ वर्षीय मुलगी तिच्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. ५ मे रोजी मुलगी हि तिच्या घरी असतांना, तिला काहीतरी आमिष दाखवून अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले. दुपारी ३ वाजेच्या सुमारास प्रकार समोर आल्यानंतर मुलीचे वडीलांनी नशीराबाद पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र साळुंखे हे करीत आहेत.

Protected Content