Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एमआयडीसी परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी भागातील एन सेक्टरमधून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एमआयडीसी परिसरातील एन सेक्टर येथे अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. 25 मे रोजी सकाळी 11 ते दुपारी चार वाजेच्या दरम्यान अल्पवयीन मुलगी घरी मिळून आली नाही. सर्वत्र शोध घेतला नातेवाईकांकडे ही विचारपूस केली मात्र तरीही मुलीचा शोध लागला नाही. मुलीला कुणीतरी काहीतरी फुस लावून पळवून गेल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला असून या बाबत एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून दाखल झाला आहे .पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी हे करीत आहेत.

Exit mobile version