Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरातील एका भागात राहणारी १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेत अपहरण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जामनेर पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर शहरातील एका भागात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी २१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पिडीत मुलीला राहत्या घरातून काहीतरी आमिष दाखवत फूस लावून अपहरण केल्याचे समोर आले. दरम्यान हा प्रकार लक्षात आल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर सायंकाळी साडेसहा वाजता नातेवाईकांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक मोहिते करीत आहे.

Exit mobile version