Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागातून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याची  घटना मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे.  याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी २८  नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी ही घरी असताना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून अपहरण केल्याची घटना घडली आहे. दरम्यान पीडित मुलगी घरी नसल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तिची कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे अखेर सायंकाळी ५ वाजता नातेवाईकांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल करीत आहे.

Exit mobile version