Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घोडगावातून अल्पवयीन मुलाचे अपहरण

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील घोडगाव येथील अल्पवयीन मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण करून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील घोडगाव विवेक गणेश पाटील (वय-१६) हा मुलगा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २८ मे रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घर असतांना अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत त्याचे अपहरण केल्याचे उघडकीला आले. विवेकच्या आईने त्याचा परिसरात शोधाशोध केली परंतू तो कुठेही आढळून आला नाही. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल जाधव करीत आहे.

 

 

Exit mobile version