Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आबासो दत्ता पवार पतसंस्था चेअरमनपदी प्रशांत पवार

भडगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथिल आबासो दत्ता पवार नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रशांत पवार यांची बिनविरोध फेरनिवड झाली. तर व्हाईस चेअरमनपदी साहेबराव पाटील यांची निवड करण्यात आली.

आबासो. दत्ता पवार नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच बिनविरोध संपन्न झाली. नवनिर्वाचित पंच कमेटी बैठक निवडणुक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक सहकार अधिकारी भुषण बारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रशांत पवार याची बिनविरोध चेअरमन म्हणुन फेरनिवड करण्यात आली. तर व्हाईस चेअरमन पदी साहेबराव पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी चेअरमन प्रशांत पवार, व्हाईस चेअरमन साहेबराव पाटील याचा सत्कार करण्यात आला. तसेच निवडणुक कामी सहकार्य केले म्हणुन सहा सहकार अधिकारी भुषण बारी व संस्थेचे कॕशियर संजय पवार यांची नाभिक समाजध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्याच्या सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित सर्व संचालक उपस्थित होते.

यावेळी प्रशांत पवार, राजेद्र सोनवणे, साहेबराव पाटील, अतुल पाटील, गणेश वाणी, रविद्रशेठ सोनार, हाजी जाकीर कुरेशी, दिपक निकम, कीरण पाटील, निर्मला महाजन, सिमा पाटील हे उपस्थित होते.

निवड प्रक्रीया साहाय्य निंबधक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शन खाली कार्यालय प्रमुख डी. एस. पाटील, अविनाश पाटील, चतुर्थ श्रेणी कर्मचारी प्रेमसिग पाटील, संस्थेचे मॕनेजर प्रमोद जडे, कॕशियर संजय पवार, लिपीक संजय येवले, देवेद्र पवार, प्रमोद पाटील यांनी सहकार्य केले.

Exit mobile version