Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अ.भा. मारवाडी महिला संमेलनातर्फे अवयवदान जनजागृती रॅली

jalgaon aaa

 

जळगाव प्रतिनिधी । अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनातर्फे शहरासह देशभरात अवयवदानाची जनजागृती रॅली काढण्यात आली असून रॅलीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आल्याची माहिती अध्यक्षा अंशू अग्रवाल यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनातर्फे अवयवदानाचे महत्व सांगणारी जनजागृती रॅली शहरासह देशभर काढण्यात आली. रॅलीद्वारे अवयवदान आणि देहदान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते. प्रांतीय अध्यक्षा पद्मा गोयंका यांचे मार्गदर्शनाखाली ह्या रॅलीचे आयोजन करण्यात आले असून रॅली यशस्वी झाली आहे. तसेच जनजागृत रॅलीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नोंद करण्यात आली असून प्रमाणपत्र राष्ट्रीय अध्यक्षा उषा टीब्रेवाल यांनी स्वीकारले आहे.

Exit mobile version