Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘आषाढी एकादशी यात्रा स्पेशल’ रेल्वेला रक्षा खडसेंनी दाखवला हिरवा झेंडा (व्हिडीओ)

raksha khadase

भुसावळ प्रतिनिधी । आषाढी एकादशी निमित्त भुसावळ येथून आज विशेष रेल्वे गाडी सोडण्यात आली आहे. खानदेश बुलढाणा जिल्ह्यातील पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना या गाडीचा लाभ होणार आहे.

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची मांदियाळी होते. विठुरायाच्या भेटीला आतुर असलेले वारकरी दिंडी-पालखीच्या माध्यमातून पंढरपुरात दाखल होतात. खानदेश विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील वारकऱ्यांना विठ्ठलाच्या दर्शनाचा लाभ मिळावा, याकरिता माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार रक्षाताई खडसे व परिसरातील आमदारांच्या प्रयत्नाने भुसावळ रेल्वे स्थानकावरून आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येते आहे. गेल्या 5 वर्षापासून ही गाडी सोडण्यात येत असून खा. रक्षा खडसे, भुसावळचे आमदार संजय सावकारे व मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती यांनी आज भुसावळ स्थानकावरून या गाडीला हिरवी झेंडी दिला आहे. विशेष म्हणजे या गाडीत प्रथमत आरक्षित बोगी लावण्यात आली असून, ज्येष्ठ वृद्ध वारकऱ्यांसाठी ही विशेष सोय यावर्षी पासून सुरुवात करण्यात आली आहे. यावेळीही अनेक पदाधिकाऱ्यांनी टाळमृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांचे स्वागत करून या गाडीने पंढरपूर करिता प्रस्थान केले.

Exit mobile version