Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आशा स्वंसेविकांच्या वेतनवाढीचा निघाला जीआर ! : आयटकतर्फे सरकारचे आभार

चोपडा प्रतिनिधी । आशा स्वयंसेविकांच्या वेतनवाढीच्या निर्णयाबाबतचा जीआर निघाला असून आयटकने राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

याबाबत वृत्त असे की, ४ सप्टेंबर २०१९ पासून आयटक व महाराष्ट्र राज्य आशा गत प्रवर्तक संघटनांच्या कृती समितीने मानधन वाढीसाठी निर्णायक लढाई सुरू करण्यात आली होती. १६ सप्टेंबर २०१९ रोजी फडणवीस सरकारने काढलेल्या परिपत्रकानुसार ही लढाई मागे घेण्यात आली होती. नंतर निवडणूक झाली व सरकार स्थापनेच्या घोळ सुरू झालेने मानधनवाढ खोळंबली. तथापि याचा पाठपुरावा सुरू ठेवण्यात आला. या अनुषंगाने ११ मे १३ मे दरम्यान राज्यभर निदर्शने करण्यात आली. तर ३ जुलैपासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला होता. यामुळे अखेर दिनांक २५ जून २०२० रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आशा व गटप्रवर्तक यांना अनुक्रमे अनुक्रमे २००० व ३००० रुपये अशी भरीव मानधन वाढ घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयाच्या जीआर १७ जुलै २०२० रोजी महाराष्ट्र शासन आरोग्य खात्याने काढला आहे. याबद्दल जळगाव जिल्हा आशा व गटप्रवर्तक आय टक संघटनेतर्फे जिल्हाध्यक्ष का अमृत महाजन, भगतसिंग पाटील, रेखा सोनार, ा ललिता सोनार, जिल्हाध्यक्ष सुलोचना साबळे, मीनाक्षी सोनवणे, मालू नरवाडे, कविता सरोदे, शैला परदेशी, भारती धनगर, आशा पाटील, संगीता सातपुते, जहिरा फारुकी, सुनीता ठाकर, शालिनी पाटील, विद्या देवी कोळी, मनीषा पाटील, प्रतिभा पाटील, विद्या पाटील, कल्पना महाले, सुशीला पाटील, वनिता मोरे, वंदना सोनार, वंदना पाटील संगीता पाटील, ललिता भादले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आभार मानले आहे.

Exit mobile version