Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आरक्षणापेक्षा तरुणांना शिक्षणाची ओढ असावी ; अरुणभाई गुजराथी

arunbhai

चोपडा प्रतिनिधी । येथे विश्व आदिवासी गौरवदिन दि. 9 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला होता. आज प्रत्येक समाजात आरक्षणासाठी चढाओढ़ सुरु आहे. आरक्षणाच्या नावाखाली आदिवासी तरुण-तरुणी दिशाभूल होत शिक्षणाकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. यात खरा आदिवासी आणि बनावट आदिवासी हा नवा वाद असल्याने विषय गंभीर आहे. आरक्षणासाठी मोर्चे निघतात मात्र शिक्षणासाठी मोर्चे निघत नसल्याची खंत व्यक्त करत, आरक्षणापेक्षा शिक्षणाची कास धरा असे आवाहन महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, कार्यक्रम समारोपाच्या अध्यक्षस्थानी तालुक्याचे माजी आमदार जगदीश वळवी हे होते. आपल्या अध्यक्षीय आणि अभ्यासनीय मनोगतात बोलतांना जगदीश म्हणाले की, आजच्या आदिवासी गौरव दिनानिमित्त किमान 10 हजार आदिवासी बांधव या कार्यक्रमात सहभागी होतील असे आमचे नियोजन होते. पण हवामान खात्याने अतिवृष्टिचा इशारा दिल्यामुळे तो सुदैवाने खरा ठरु शकला नाही. म्हणून आदिवासी बंधुभगिनी यांची ग़ैरसोय होउ नये यासाठी 8 ऑगस्ट रोजी सांयकाळी सर्वांना संपर्क करुन कार्यक्रमास येवू नये अशी विनंती करण्यात आली. आदिवासी दिवस हा दरवर्षी येतो तो आता नाहीतर पुढल्या वर्षी साजरा करता येईल पण आज महाराष्ट्रभर पावसाची, पाण्याची आवश्यकता आहे. आज वरूण राजाने कृपा केली हाच आमचा आदिवासी दिवस साजरा झाला असे मी समजतो.

पुढे बोलतांना म्हणाले की, चोपडा तालुक्यातील आमचेच काही आदिवासी तरुण चुकीचे काम करुन आम्हा आदिवासी बंधु भागिनिंना एकत्र येवू देत नाही कारण त्यांना भीती असते, की समाज एक झाला की सामाजिक प्रश्न विचारला जाईल. अश्या इतरांच्या तव्यावर पोळी शेकणाऱ्या तथाकथित राजकीय मंशा असणाऱ्या व्यक्तिपासून समाजाने सावध राहिले पाहिजे. कोणत्याही आदिवासी विद्यार्थी आला की त्याला आधी शिक्षण पूर्ण कर मग राजकारणात ये असा सल्ला दिला जातो. पण काही माणसे तरुण वर्गाला भटकवतात. आपलेच आपल्याला संपवण्याच्या मार्गावर आहेत अश्या अति उत्साही पण समाजात दुफळी निर्माण करणाऱ्यांपासुन आदिवासी तरुणांनी सावध राहिले पाहिजे. माझे आदिवासी बंधुभगिनी शिकले पाहिजे. ते आयएस, आईपीएस झाले पाहिजेत म्हणून मी भविष्यात लवकरच शहरात स्पर्धा परीक्षा केंद्र आणून साऱ्यांची सोय करील यासाठी मी माझी सर्व शक्तीपणाला लावीन आदिवासी मूल-मुली यांनासाठी वस्तीगृहाची गरज असून ते आणण्यासाठी सरकारला भाग पाडेल.

शहरातील जूना यावल रोड येथील अग्रसेनभवन येथे सकाळी 11 वाजता आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. सुरुवातीस आदिवासी समाजाचे आराध्य दैवत देव मोगरामाता विरसामुंडा यांच्या प्रतिमेस अरुणभाई गुजराथी, जगदीशभाऊ वळवी, रचनाताई वळवी, रमेशबापू ठाकुर, रज्जाक तडवी, राजुदादा तडवी, कु राजश्री वळवी, सीताराम पारधी, आदिवासी पारधी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब सालुंखे, महासचिव राणा सोनवणे, हैदराबाद येथील के.गोपी पारधी, प्रदेश अध्यक्षा इंदुमती सालुंखे (गुजरात), मुकेश सालुंखे (मुंबई), उमाकांत चव्हाण (मुंबई), सुरेश सोनवणे (नाशिक), दीपक खांदे (नांदगांव), कांचन राणे आदी मान्यवरांच्या हस्ते पूजन व माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी उपस्थित सर्वच आदिवासी बांधवांनी पारंपारिक पद्धतीने आदिवासी नृत्य करुन ‘आमू आखा एक छे’ म्हणत आनंद व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक शामसिंग वळवी यांनी केले.

Exit mobile version