Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आमीर खान हा चीन व तुर्कीचा लाडका- संघाची टीका

मुंबई वृत्तसंथा । अभिनेता आमीर खान हा चीन व तुर्कस्थानचा लाडका असल्याची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचया मुखपत्रातून करण्यात आली आहे.

अभिनेता आमीर खान याच्यावर संघाने टीका केली आहे. संघाचे मुखपत्र असणार्‍या ऑर्गनायझरमध्ये ड्रॅगनका प्यार खान या शीर्षकाखालील लेखात आमीरला लक्ष्य करण्यात आले आहे. आमिर हा चीनमधील सत्ताधारी पक्षाचा लाडका असल्याचा टोला संघाने आपल्या मुखपत्रामधून लगावला आहे. तसेच भारताविरोधात असणार्‍या देशांबद्दल आमिरच्या भूमिकेसंदर्भात प्रश्‍न या लेखामध्ये उपस्थित करण्यात आले आहे.

तुर्कीच्या राष्ट्रपतींच्या पत्नीची भेट घेतल्याच्या पार्श्‍वभूमीवर तसेच चिनी कंपन्यांची जाहिराती आमिर करत असल्याचे या लेखमध्ये नमूद करण्यात आलं आहे. स्वातंत्र्याच्या आधी आणि त्यानंतरही देशभक्ती या विषयावर चित्रपट निर्माण झाले. मात्र नंतर चित्रपटांना पाश्‍चिमात्य संस्कृतीची हवा लागली आणि नेतृत्व करणारा चित्रपट संपला.

मागील पाच ते सहा वर्षांमध्ये पुन्हा एकदा देशभक्तीवर आधारित चित्रपटांची संख्या वाढलेली दिसते. मात्र दुसरीकडे असे काही अभिनेते आणि चित्रपट निर्माते आहेत ज्यांना आपल्या देशाबरोबर वैर असणारे चीन आणि तुर्कीसारखे देश जास्त आवडतात, अशा शब्दांमध्ये आमिरवर निशाणा साधण्यात आला आहे.

भारतामध्ये एखाद्या अभिनेत्याला लोकं डोक्यावर घेऊन नाचतात आणि यशाच्या शिखरावर पोहचवतात तेव्हा त्याचा धर्म पाहिला जात नाही. त्याच्या चित्रपटांवर लोकं खूप पैसे उधळतात. लोक त्याच्या धर्माची नाही तर त्याच्यातील कलाकाराचे कौतुक करतात, असंही या लेखामध्ये म्हटलं आहे. मात्र जेव्हा अशी व्यक्ती देशातील लोकांना ठेंगा दाखवून त्यांच्या प्रेमाच्या मोबदल्यात आधी धर्म नंतर देशसारखी जिहादी विचारसरणी दाखवू लागते किंवा थोड्या पैशांसाठी शत्रू देशाच्या इशार्‍यावर नाचू लागते तेव्हा चीड येते. अशी व्यक्ती शत्रू राष्ट्रातील पाहुणचार निर्ल्जमपणे कबुल करु लागली तर देशातील लोकांनी त्यांची फसवणूक झाली आहे असं समजावं का?, आजकाल चीन आणि तुर्कीचा लाडका ठरत असलेल्या आमिर खानच्या याच सर्व गोष्टींचा त्याच्या चाहत्यांना आणि सामान्य देशभक्तांना राग येत आहे, असंही लेखात म्हटलं आहे.

Exit mobile version