Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लवकरच रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास आम आदमी पार्टीचा आंदोलानाचा इशारा

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरात रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे रोड खराब होत असून जागोजागी खड्डे झाले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात चालणेदेखील कठीण होत असून लवकरच रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन आम आदमी पार्टीतर्फे प्रांताधिकारी यांना देण्यात आले.

आम आदमी पार्टीतर्फे आज शहरातील पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यात आले. रस्त्याने जाणेदेखील अवघड झाले असून येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर रस्त्याची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आला.

याप्रसंगी निवेदन देताना आम आदमी शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य सहसचिव दिलीप सुरवाडे, भुसावळ तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील, अल्पसंख्याक आघाडी जळगावचे इरशाद खान, युवा आघाडीचे अध्यक्ष करन लखन, पदाधिकारी रितेश सोनवणे आदी उपस्थित होते.

Exit mobile version