Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आजाराला कंटाळून एकाची गळफास घेवून आत्महत्या

चोपडा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कमरेच्या त्रासाला कंटाळून तालुक्यातील धुपे येथील ४५ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आाली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, ज्ञानेश्वर भगवान पाटील (वय-४५) रा. धुपे ता. चोपडा हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना कमरेचा त्रास सुरू होता. औषधोपचार करूनही कोणताही आजारात फरक पडला नाही. या संदर्भात त्यांनी चांगल्या डॉक्टरांकडे देखील उपचार घेतला. दरम्यान, ज्ञानेश्वर पाटील यांनी मध्यरात्री राहत्या घरात कमरेच्या आजाराला कंटाळून छताला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार देविदास ईशी करीत आहे.

Exit mobile version