Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निवेदन देणार्‍या आदिवासी कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात ( व्हिडीओ )

अमळनेर प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या आदिवासी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा निषेध करण्यात येत आहे.

याबाबत वृत्त असे की, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शहरात सभा झाली. याप्रसंगी आदिवासी पारधी विकास परिषद व आदिवासी एकता संघर्ष समिती राज्याचे मुख्यमंत्र्यांना आदिवासींमधे घुसखोरी होवू नये बाबतचे विनंती निवेदन देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र प्रशासनाने दबावतंत्र वापरत आदिवासी पारधी विकास परिषदेचे खान्देश प्रांताध्यक्ष पन्नालाल मावळे यांच्यासह आदिवासी एकता संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्ष प्रा. जयश्री साळुंके, आदिवासी पारधी विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय पवार, कोषाध्यक्ष पंडित चव्हाण, सचिव प्रकाश पारधी, तालुका अध्यक्ष अविनाश पवार, मधुकर चव्हाण, भुरा पारधी, पुनमचंद पारधी, नंदाबाई मावळे, मनोज पारधी, अशोक पवार धनराज पारधी तसेच अन्य आदिवासी कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. यामुळे या दडपशाहीचा आदिवासी समुदायातर्फे विरोध करण्यात येत आहे. कार्यकर्त्यांना अटक करत असतांना आदिवासींनी जोरदार निदर्शने करून आपला रोष व्यक्त केला.

पहा : या घटनेचा व्हिडीओ.

Exit mobile version