आयकर भरण्यासाठी आधार व पॅनकार्डची जोडणी हवीच

नवी दिल्ली । आयकर भरण्यासाठी आधार कार्ड व पॅन कार्ड जोडणी अनिवार्यच असल्याचा निर्वाळा पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने मध्यंतरी दोन याचिकाकर्त्यांना याशिवाय प्राप्तिकर भरण्याची मुभा दिली होती. मात्र दरम्यानच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात नि:संदिग्ध निर्णय दिल्याने केंद्र सरकारने पुन्हा न्यायालयात याचिका केली होती. याच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने आयकर भरण्यासाठी आधार व पॅनकार्ड हे एकमेकांशी संलग्न असणे अनिवार्य असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.

Add Comment

Protected Content