Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आधारकार्ड बदलाचे शुल्क आता १०० रुपये

नवी दिल्ली वृत्तसंस्था । आधार प्राधिकरणाने (UIDAI ) केलेल्या एका ट्विटमध्ये आधार कार्ड अपडेट करताना बदल केल्याचे सांगितले आहे.

यापुढे आधार कार्डमध्ये काही बदल करायचे असतील तर त्यासाठी १०० रुपये द्यावे लागतील. आधार कार्डमधील बायोमेट्रिक अपडेटसाठी १०० रुपये तर डेमोग्राफिक तपशील बदलण्यासाठी ५० रुपये द्यावे लागणार आहेत.

एखाद्या आधार कार्डधारकाला जर त्याच्या डेमोग्राफिक तपशील म्हणजे जन्म तारीखेतमध्ये बदल करायचा असेल तर त्याला त्या संदर्भातील कागदपत्रे जमा करावी लागतील. यासाठी UIDAIने ३२ कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे. या कागदपत्रांच्या आधारे आधार कार्डधारक माहिती अपडेट करू शकतो.

आधार कार्डमधील काही बदल हे कोणत्याही कागदपत्राशिवाय देखील होऊ शकतात. उदा- मोबाईल नंबर, आधार कार्डवरील फोटो यासाठी कोणत्याही कागदपत्राची गरज नाही. या शिवाय बायोमेट्रिक्स, लिंग आणि इ-मेल आयडीसाठी कोणत्याही कागदपत्राची गरज नाही.

Exit mobile version