Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मानमोडी येथे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीराचे आयोजन

बोदवड – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुका बोदवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व फ्रंटल कडून प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील यांच्या वाढदिवस सप्ताहात माजी मंत्री मा.नाथाभाऊ, जिल्हा अध्यक्ष अॅड भैय्यासाहेब पाटील, अॅड.रोहिणीताई खडसे, रवींद्र पाटील यांचे मार्गदर्शनात विविध उपक्रमांसह आरोग्य शिबीर, शासकीय योजना फॉर्म भरणे कार्यक्रम राबवत आहोत.

या “आरोग्य शिबिर” कामी मनुमाता हॉस्पिटल भुसावळ संचलित डॉ.निलेश झोपे, डॉ.उदय पाटील व झोपे लॅब स्टाफ यातून रक्तदाब, ECG, रक्तगट, साखर तपासणी केली. प्रत्येक रुग्णाचा एक हजार रुपयांचा फायदा झाला. खर्च वाचला व सुमारे 300 लोकांची या आरोग्य शिबिरात मोफत तपासणी करण्यात आली.

शिबिरास तालुका कार्यअध्यक्ष निलेश पाटील, सुरवाडा बू उपसरपंच मनोहर दादा सुरवाडे यांनी भेट दिली.

यशस्वी आयोजन: आबा पाटील (जिल्हा समन्वयक राष्ट्रवादी युवक काँग्रेस), सतीश पाटील (म सरपंच),जगदीश कोळी (मा.उपसरपंच) कैलास नाना, योगेश कोळी, विजू तारू, गोपाल इंगळे, जगदीश प्रमोद पाटील, जगन पवार, नितीन कोळी, भारत गाढेकर यांच्यासह सर्व सहकारी ग्रामस्थ आदर्शगाव मानमोडी करांनी मदत केली.

सर्वांचे वतीने डॉ.उदय पाटील यांचे आभार मानले. पुढील दिवसात डोळ्यांची तपासणी करण्याची तारीख निश्चित होईल.

Exit mobile version