Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ. संजय सावकारे यांच्या शिफारशीमुळे ५ कोटीच्या कामांना मंजुरी

sawkare

भुसावळ प्रतिनिधी । येथील आमदार संजय सावकारे यांनी शिफारस केलेल्या भुसावळ विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील विविध गावासाठी ५ कोटींच्या कामाना शासनाची मंजुरी मिळाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यात कंडारी येथे स्‍मशान भूमी रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी १५ लाख रुपये, विष्णू चौधरी यांच्या शेतामधील रस्ता डांबरीकरण करण्यासाठी २० लाख रुपये, झेडटीएस मधील समशान भूमी रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी १० लाख रुपये, झेडटीएस रेल्वे ग्राउंड ते डोंगरे यांच्या घराजवळ रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी १० लाख रुपये, फेकरी येथे अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी २० लाख, जाडगाव येथे सार्वजनिक सभागृह बांधकामासाठी १५ लाख, मन्यारखेडा येथे सार्वजनिक सभागृहाचे बांधकामासाठी १५ लाख, काहूरखेडा येथील सार्वजनिक सभागृह बांधकाम करण्यासाठी १० लाख रुपये, काहूरखेडा ते फॅक्टरी रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी १५ लाख रुपये, खडका येथील उस्मानिया मस्जिद ते कब्रस्तान रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी २० लाख रुपये, किन्‍ही-वेल्हाळा रस्ता डब्ल्यूबीएम करण्यासाठी ५ लाख, खेडी रस्त्याचे डांबरीकरण ३० लाख रुपये, साकरी-खडका रस्ता डांबरीकरण करून छोट्या मोरीचे बांधकामासाठी ३० लाख मंजूर झाले आहे.

तर आचेगाव ते पिंपळगाव खुर्द रस्ता व मोरीचे बांधकाम ५० लाख व सार्वजनिक सभागृहाचे बांधकाम २० लाख रुपये, तळवेल येथे सार्वजनिक सभागृह बांधकाम २० लाख रुपये, खडका येथे अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण १५ लाख रुपये, बोहर्डी येथे सार्वजनिक सभागृहाचे बांधकाम २० लाख रुपये, बोहर्डी-तळवेल रस्त्याचे डांबरीकरण १५ लाख रुपये, वराडसीम येथे सार्वजनिक सभागृह २० लाख रुपये, सुनसगाव सार्वजनिक सभागृह बांधकाम २० लाख व बस स्टँड भागात पेव्‍हर ब्लॉक बसवणे १५ लाख, किन्‍ही येथे सार्वजनिक सभागृह बांधकाम २० लाख, वेल्हाळे येथे सार्वजनिक सभागृह २० लाख, पिंपळगाव खुर्द ते बेघरवस्ती पूल रुंदीकरण करून रस्ता डांबरीकरण २५ लाख, कठोरा बुद्रुक येथे सार्वजनिक सभागृह बांधकाम १० लाख आणि जामनेर रस्‍ता राज्य महामार्ग ते मांडवेदिगर रस्ता डांबरीकरण १५ लाख रुपये असे एकूण ५ कोटींच्या कामांचा समावेश आहे. यामुळे ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Exit mobile version