Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल शहरात गावठी पिस्तूल घेवून दहशत माजविणाऱ्या तरूणाला अटक

यावल प्रतिनिधी । शहरातील बुरूज चौकात गावठी कट्टा कमरेला लावून दहशत माजविणाऱ्या एका तरूणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याच्या ताब्यातील २० हजार रूपये किंमतीचा गावठी कट्टा हस्तगत केला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यश राजेंद्र पाटील (वय-२२) रा. सुंदर नगरी यावल असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, यावल शहरातील बुरूज चौकात एक तरूण बेकायदेशीर व विनापरवाना गावठी पिस्तूल कमरेला लावून फिरत असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना माहिती मिळाली. त्यानुसार पथक जळगावहून यावलला आज मंगळवारी २७ जुलै रोजी दाखल झाले. दुपारी पथकाने सापळा रचून संशयित आरोपी यश राजेंद्र पाटील याला अटक केली. त्याच्या ताब्यातील २० हजार रूपये किंमतीचा गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आला आहे. यावल पोलीस ठाण्यात पोलीस कान्स्टेबल रणजीत जाधव यांच्या फिर्यादीवरून आर्म ॲक्ट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यांनी केली कारवाई 

पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक महाजन, शरीफ काझी, पोलीस नाईक युनुस शेख, किशोर राठोड, पोलीस कान्स्टेबर विनोद पाटील, रणजित जाधव यांनी कारवाई केली.

Exit mobile version