Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कडगावातील तरूण झाला बेपत्ता

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कडगाव येथील २४ वर्षीय तरूण हा घरात कुणाला काहीही न सांगता २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेपासून बेपत्ता झाला आहे. याबाबत गुरूवार ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मोहन आनंद कोळी वय-२४ रा. काडगाव ता.जि. जळगाव असे बेपत्ता झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कडगाव येथील मोहन आनंद कोळी हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता मोहन कोळी हा तरूण घरात कुणाला काहीही न सांगता घरातून निघून गेला. रात्री उशीरापर्यंत मोहन कोळी हा घरी आला नाही. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी याची चिंता व्यक्त करत त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतू त्याची माहिती कुठेही मिळाली नाही. अखेर गुरूवार ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली. त्यानुसार नशिराबाद पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करीत आहे.

Exit mobile version