Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुंतवणुकीत नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत चाळीसगाव येथील तरुणाची फसवणूक

 चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |डिजिटल करंसीमध्ये गुंतवणूक केल्यास त्यावर नफा देण्याचे अमिष दाखवून तरुणाची २ लाख ९६ हजार रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात शनिवारी १६ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता अज्ञात तीन जणांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव येथे खाजगी नोकरी करणारे संकेत जयराज बडगे (२५, मूळ रा. तिरोडा, जि. गोंदिया, ह.मु. चाळीसगाव) यांच्या व्हॉटस् अप क्रमांकावर तीन जणांनी संपर्क साधून डिजिटल करंसीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. यासाठी त्यांनी ३ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या दरम्यान वारंवार संपर्क साधून विश्वास संपादन केला व वेळोवेळी ऑनलाईन रक्कम स्वीकारली. दीड महिना होऊनही नफा मिळाला नाही. नफा तर दूरच राहिला मुद्दल रक्कमही गेल्याने आपली फसवणूक झाल्याचे बडगे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संपर्क साधणाऱ्या तीन जणांविरुद्ध जळगाव सायबर पोलीस ठाण्यात शनिवारी १६ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील करीत आहेत.

Exit mobile version