Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ट्रकवर दुचाकी आदळल्याने अयोध्या नगरातील तरूणाचा जागीच मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । भरधाव दुचाकी ट्रकवर आदळल्याने ३६ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

प्रवीण साईनदास पवार (वय ३६, रा.अयोध्या नगर) असे मयत तरूणाचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, प्रवीण पाटील हे आई, पत्नी, बहिण आणि मुलगा यांच्यासह अयोध्या नगरात वास्तव्याला आहे. सुप्रिम कॉलनीत मेडीकल चालवून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी सायंकाळी ते मेडीकलवर जात असताना एमआयडीसीत वासुमित्रा हॉटेलजवळ थांबलेल्या ट्रकवर दुचाकी आदळली. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अमलदार मुदस्सर काझी यांनी प्रवीण यांना शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. नातेवाईकांनी त्यांना तेथून खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्या मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version