Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सिंधी कॉलनीत चहा विक्रेत्या तरूणाला एकाकडून मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी ।  शहरातील सिंधी कॉलनी येथे चहा विक्रेत्या तरुणाला उसनवार पैसे मागितल्याच्या कारणावरून एकाने काचेचा ग्लास डोक्यावर मारून दुखापत केल्याची घटना सोमवार १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. याबाबत रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, कमलेश बुदलदास चिमणाणी (वय-३८, रा.बाबा नगर, सिंधी कॉलनी, जळगाव) जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून चहाची टपरी चालवून तो आपला उदरनिर्वाह करत असतो. त्याने लकी अशोक कुमार बुलानी रा. सिंधी कॉलनी याला उसनवारीने पैसे दिले होते. सोमवार १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता कमलेश चिमणाणी याने दिलेल्या पैसे मागितले. याचा राग आल्याने याने चहाच्या टपरीवरील काचेचा ग्लास हातात घेऊन कमलेश याच्या डोक्यात मारला. त्यात कमलेश याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेबाबत रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version