Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हॉटेलसमोरून तरूणाची दुचाकी लांबविली

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील साकेगाव येथील शिवम हॉटेलजवळून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १७ ऑक्टोबर  रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनीवारी २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बोदरसिंह मदनसिंह भिलाला (वय-२४) रा. नेपानगर, मध्यप्रदेश ह.मु. साकेगाव ता.भुसावळ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. १७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता बोदरसिंह हा त्यांची दुचाकी क्रमांक (एमपी १२ एन ५४२३) ने साकेगावातील शिवम हॉटेलजवळ आलेला होता. त्यावेळी त्याने दुचाकी हॉटेलच्या समोर पार्क करून लावली होती. अज्ञात चोरट्यांनी ६० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेच मिळाली नाही. अखेर शनिवारी २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय भोई करत आहे.

Exit mobile version