Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्तेश्वर नगरातून तरूणाची दुचाकी लांबविली

नशिराबाद पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यात नशिराबाद गावातील मुक्तेश्वर नगरातून एका तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २४ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुरूवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काशीराम निर्मल देव राठोड ( वय-३८ रा.चेनपूर ता. झिरण्या जि. खरगोन मध्यप्रदेश) ह.मु. मुक्तेश्वर नगर हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. २३ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता त्याने त्याची दुचाकी क्रमांक (एमपी १० एनडी ४७७८) घरासमोर पार्कींगला लावलेली होती. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री दुचाकी चोरून नेली. हा प्रकार दुसऱ्या दिवशी २४ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता लक्षात आला. त्यानंतर त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर गुरूवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता नशिराबाद पोलीसात तक्रार दिल.त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन देशमुख करीत आहे.

Exit mobile version