Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जानकी नगरातून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जानकी नगरातून तरूणाची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी बुधवारी २९ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, भुषण धनराज चौधरी (वय-२८) रा. जानकी नगर, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. जिम चालवून आपला उदरनिर्वाह करतो. २५ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता त्याने त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीझेड ८०८२) ही घरासमोर पार्क करून लावली होती. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्याने पार्क करून लावलेली दुचाकी चोरून नेली. हा प्रकार शनिवारी रविवारी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आला. त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळाली नाही. अखेर गुरूवारी २९ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर पाटील करीत आहे.

Exit mobile version