Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गिरणा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा बुडून मृत्यू

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उपखेड आश्रम शाळेजवळील गिरणा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी २८ मे रोजी ४.३० वाजता घडली. त्याचा मृतदेह बुधवारी २९ मे रोजी पहाटे ४ वाजता पाण्यात तरंगतांना आढळून आला. याप्रकरणी मेहुणबारे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ओम विजय चव्हाण वय १८ रा. हिसवड ता. मालेगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड गावाजवळ उपखेड आश्रम शाळेत ओम चव्हाण हा तरूण वास्तव्याला होता. दरम्यान आश्रम शाळेच्याजवळ गिरणा नदी पात्र आहे. मंगळवारी २८ मे रोजी दुपारी ४.३० वाजता ओम चव्हाण हा पोहण्यासाठी गिरणा नदी पात्रात गेला होता. त्यानंतर त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. त्याचे शोधकार्य सुरू असतांना बुधवारी २९ मे रोजी पहाटे ४ वाजता त्याचा मृतदेह वरखेड गिरणा नदी पात्रात तरंगतांना आढळून आला. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ मोहन सोनवणे हे करीत आहे.

Exit mobile version