जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील नांदू पिंप्री येथील तरुणाने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर जळगाव शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना शनिवारी ६ जुलै रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला आहे. पवन आत्माराम इंगळे (वय २५, रा. नांदू पिंप्री ता. मुक्ताईनगर, ह.मु. पुणे) असे मयत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील नांदू पिंप्री गावात पवन इंगळे हा तरूण वास्तव्याला होता. गोल्या काही महिन्यांपासून तो पुण्यात नोकरीनिमित्त राहत होता. तरूण पुण्यात असतांना त्याने विषारी औषध सेवन केल्याने त्याला जळगाव येथील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना शनिवारी ६ जुलै रोजी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. विषारी औषध घेण्याचे कारण समजू शकले नाही. सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह दाखल करण्यात आला. याबाबत पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.