Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तीन महिन्यापुर्वीच लग्न झालेल्या तरूणाने केलं अस काही !… कुटुंबाचा आक्रोश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सुप्रिम कॉलनीतील ३० वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी २७ जुलै रोजी दुपारी २ वाजता उघडकीला आला आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेली नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पवन अमरसिंग पवार (वय-३०) रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, पवन पवार हा तरूण जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. बांधकाम मिस्तरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. त्यांच्या सोबत घरात आई,वडील, दोन भाऊ, पत्नी आणि वहिनी असा परिवार होता. दरम्यान, गुरूवारी २७ जुलै रोजी दुपारी २ वाजता घरातील सर्वजण कामाला निघून गेले होते. पवनची आई दुर्गाबाई या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यामुळे पवन हा घरात एकटाच होता. त्याने राहत्या घराच्या मधल्या खोलीत दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. दरम्यान, त्यांची आई घरात आल्यानंतर मुलाचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. शेजारी राहणाऱ्या तरूणांनी धाव घेत त्याला खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले.

तीन महिन्यापुर्वीच झाला होता विवाह

पवन पवार यांचा विवाह तीन महिन्यापुर्वीच झालेला होता. घरात सर्व एकत्र कुटुंब असतांना सर्वजण हसतखेळत राहता असतांना अचानक त्याने टोकाचा निर्णय का घेतला.  याची माहिती मिळाली नाही. मयताच्या पश्चात आई दुर्गाबाई, वडील अमरसिंग पवार, मोठा भाऊ अर्जून, लहान भाऊ आकाश, पत्नी आणि वहिनी असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अतुल पाटील करीत आहे.

Exit mobile version