Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लहान मुलांच्या खेळण्यावरून तरूणावर लोखंडी कोयत्याने वार

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील झामी चौकात राहणाऱ्या लहान मुलांच्या खेळण्यावरून वाद घालत तरूणावर लोखंडी कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना शनिवारी २० एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रविवारी २१ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील झामी चौकात फिरद शेख गुलाम नबी वय २३ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी २० एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या गल्लीत लहान मुलांच्या खेळण्यावरून फिरद शेख याच्यासोबत कामील अफजल खान पठाण याने वाद घातला. त्यानंतर या वादातून हाणामारीला सुरूवात झाली. यात फिरद शेख गुलाम नबी या तरूणाला गल्लीत राहणारे कामील अफजल खान पठाण, युसूफ अफजल पठाण, नाजीया युसूफ पठाण, रूखसाना अफजल पठाण आणि अफजल गुलाब खान पठाण यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. यातील कामील याने हातातील लोखंडी कोयता फिरदच्या डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली. दरम्यान जखमी झालेल्या फिरदला तातडीने अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी रविवारी २१ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात कामील अफजल खान पठाण, युसूफ अफजल पठाण, नाजीया युसूफ पठाण, रूखसाना अफजल पठाण आणि अफजल गुलाब खान पठाण सर्व रा. झामी चौक, अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ हे करीत आहे.

Exit mobile version