Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किरकोळ कारणावरून तरूणावर धारदार वस्तूने वार

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सम्राट कॉलनी परिसरातील लक्ष्मी नगर येथे भाजीपाला विक्रेत्यावर किरकोळ कारणावरून धारदार वस्तूने वार करून जखमी केल्याची घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

शुभम पुंडलिक महाजन (वय ३०, रा. सम्राट कॉलनी, जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी २८ जुलै रोजी रात्री शुभम याला ललित उमाकांत दीक्षित व त्याचे साथीदार यांनी त्याच्या घराजवळ बोलाविले. किरकोळ कारणावरून त्यांच्या वाद घातला. यात एकाने मागील बाजूने उजव्या मांडीवर धारदार वस्तूने वार करून गंभीर जखमी केले व पसार झाले. ही घटना घडल्यानंतर त्याला तत्काळ कुटुंबीय व इतरांनी उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार सुरु केले आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. शुभम महाजन याने दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी २९ जुलै रोजी मध्यरात्री २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे करीत आहे.

Exit mobile version