Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कारण नसतांना तरूणावर चाकूहल्ला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवाजीनगर भागातील क्षत्रिय मंगल कार्यालयासमोर हमाल काम करणाऱ्या तरुणाला काही एक कारण नसताना एकाने चाकूने मारहाण करत गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे याप्रकरणी सोमवार 3 ऑक्टोबर रोजी मारहाण करणाऱ्या विरुद्ध जळगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

शिवाजीनगर हुडको परिसरात आनंद तुकाराम जमदाळे वय 24 हा तरुण राहतो. ३० सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी आनंद जमदाळे हा शिवाजीनगर भागातील क्षत्रिय मंगल कार्यालय समोर उभा असताना बबल्या हिरालाल जोहरे उर्फ बबल्या चॉपर हा त्या ठिकाणी आला त्याने काही कारण नसताना आनंद जमदाळे या उजव्या बाजूला कमरेवर चाकूने मारहाण करून दुखापत केली. तसेच अश्लील शिवीगाळ करत लाथांनी मारहाण केली. याप्रकरणी आनंद जमदाडे यांनी सोमवारी जळगाव शहर पोलीस आयुक्त तक्रार दिली या तक्रारीवरून बबल्या हिरालाल जोहरे उर्फ बबल्या चॉपर रा. शिवाजीनगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय झाल्टे हे करीत आहेत.

Exit mobile version