Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरधाव कंटेनरच्या धडकेत तरूण ठार

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | भरधाव कंटेनरच्या जोरदार धडकेत तरूण जागीच ठार झाल्याची दु:खद घटना रात्री तालुक्यातील वाघळी गावाजवळ घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील वाघळी येथील रोहिदास शंकर दांडगे (धनगर, वय-३९) यांना भरधाव कंटेनरने (क्र. डी.डी. ०१ एच ९४८४) जोरदार धडक दिली. यातच त्यांची प्राणज्योत मालवली. सदर घटना जळगाव – चाळीसगाव महामार्गावरील वाघळी गावाजवळ रात्री अंदाजे ९:३० वाजेच्या सुमारास घडली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सदर घटना घडताच स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मात्र घटना एवढी विचित्र घडली आहे की, अनेकांच्या मनावर परिणाम करणारी आहे. दरम्यान घडलेल्या घटनेमुळे वीज वितरण कंपनीच्या तार्‍या तुटून पडल्या आहे. यामुळे वीज वितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान यावेळी झाले आहे.

दरम्यान दिवाळीच्या दिवशी झालेल्या या घटनेमुळे गावांसह परिसरात दुःखाचा डोंगर कोसळला असून मयत रोहिदास शंकर लांडगे (धनगर) यांच्या पश्चात्य सहा वर्षाचा लहान मुलगा, मुलगी, पत्नी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे परिसरातून संवेदना व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version