Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरूणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण; गुन्हा दाखल

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील पहेलवान ढाबा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणाला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तरूणाच्या फिर्यादीवरून दोन जणांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सुर्यबहादर लालबहादुर गाळे (वय-३७) रा. वरणगाव रोड, भुसावळ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मोलमजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. जुन्या भांडणाच्या कारणावरून ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता अशोक शिंदे व अबु (पुर्ण नाव माहित नाही) आणि त्यांच्यासोबत असलेले दोन अनोळखी व्यक्ती यांनी राष्ट्रीय महामार्गावरील पहेलवान ढाबा लाकडी दांडक्याने सुर्यबहादर याला बेदम मारहाण करून दुखापत केली. तसेच शिवीगाळ करून जीवंत ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर जखमी तरूणाला भुसावळ ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर उपाचारानंतर तरूणाने दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ तेजस परिस्कर करीत आहे.

Exit mobile version