Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किरकोळ कारणावरून तरूणाला बेदम मारहाण

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी गावातील महात्मा फुलेनगर येथे किरकोळ कारणावरून एका तरूणाला काही तरूणांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजता घडली. प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पाळधी गावातील महात्मा फुले नगरात ललीत एकनाथ बाविस्कर वय ३३ हा तरूण वास्तव्याला आहे. ललीत बाविस्कर हा जयंतीच्या कार्यक्रामासाठीच्या मिटींगला येत नाही. या कारणावरून रविवारी १० मार्च रोजी रात्री ९ वाजता गावात राहणारे अनिरूध्द मनोज नन्नवरे, रत्नदीप मनोज नन्नवरे, सुशील संजय नन्नवरे, दिपक भोसले, भूषण संजय नन्नवरे, मनोज रतन नन्नवरे सर्व रा. पाळधी ता धरणगाव या सहा जणांनी ललीत बाविस्कर याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर ललीत बाविस्कर याने सोमवार ११ मार्च रोजी मध्यरात्री १२.३० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी अनिरूध्द मनोज नन्नवरे, रत्नदीप मनोज नन्नवरे, सुशील संजय नन्नवरे, दिपक भोसले, भूषण संजय नन्नवरे, मनोज रतन नन्नवरे सर्व रा. पाळधी ता धरणगाव यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विठ्ठल पाटील हे करीत आहे.

Exit mobile version