Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जुन्या वादातून तरूणाला बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कडगाव येथील मरीमाता मंदिर परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला एकाने शिवीगाळ करत बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मोहन आनंदा कोळी (वय-२४, रा. मरीमाता मंदिराजवळ, कडगाव ता. जि. जळगाव) हा तरुण कुटुंबासह वास्तव्याला आहे. शनिवार ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता मोहन हा घरी असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून गावात राहणारा गणेश बाबुराव कोळी यांनी बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या हाताला दुखापत करून पसार झाला. हा प्रकार घडल्यानंतर जखमी झालेल्या मोहन कोळी याला जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारांचा दाखल करण्यात आले. त्यानंतर मोहन कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारा संशयित आरोपी गणेश कोळी यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अलियार खान हे करत आहे.

Exit mobile version