Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किरकोळ कारणावरून तरुणाला बापलेकाकडून बेदम मारहाण

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कठोरा येथे काही एक कारण नसतांना दोन जणांनी तरुणाला लोखंडी रॉड तसेच लोखंडी पट्टीसह लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवार, १४ जुलै रोजी सकाळी नऊ वाजता घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्याताील कठोरा येथे सागर लक्ष्मण सपकाळे हा तरुण कुटुंबासह वास्तव्यास आहे. तो शेती करतो, शुक्रवारी सागर सपकाळे हा नेहमीप्रमाणे शेतात गेला होता, यादम्यान कठोरा गावाच्या पुढे एका शेताजवळ कैलास संतोष सपकाळे व  कौस्तुभ कैलास सपकाळे या दोघांनी काही एक कारण नसतांना सागर सपकाळे यास मारहाण करण्यास सुरुवात केली, यात कैलास सपकाळे याने सागर याच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारला, तर कौस्तुभ याने सागर याच्या भुवईवर लोखंडी पट्टी मारुन दुखापत केली, या घटनेत सागर हा खाली पडला असता दोघांनी पुन्हा सागर याला लाथाबुक्क्यांनी मारहााण्‍ केली, तसेच तुला पाहून घेवू, तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली, या घटनेत सागर हा जखमी झाला असून त्याच्या तक्रारीवरुन कैलास संतोष सपकाळे व  कौस्तुभ कैलास सपकाळे या दोन्ही बापलेकांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप पाटील हे करीत आहेत.

Exit mobile version