Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कारण नसतांना साकेगावात तरूणाला लाकडी दांडक्याने मारहाण

साकेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील आंबेडकर नगर येथे काहीही कारण नसतांना एका २६ वर्षीय तरूणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी सोमवारी २५ मार्च रोजी रात्री ९ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील आंबेडकर नगरात पवन अशोक सपकाळे वय २६ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी २४ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता काहीही एक कारण नसतांना पवन सपकाळे याला आंबेडकर नगरात उभा असतांना शशी प्रकाश उपासे आणि हरचंद शिवा उपासे दोन्ही रा. आंबेडकर नगर, साकेगाव यांनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी पवन सपकाळे याने भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी २५ मार्च रोजी रात्री ९ वाजता मारहाण करणारे शशी प्रकाश उपासे आणि हरचंद शिवा उपासे या दोघांवर भुसावळ तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ वाल्मिक सोनवणे हे करीत आहे.

Exit mobile version