Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

साकळी गावात महिलेची छेड काढल्यावरून एका तरुणास मारहाण

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी या गावात एका महिलेची छेड काढल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका गटाने तरुणास मारहाण केल्याची घटना घडली असुन याबाबत आरोपी आणी फिर्यादी यांनी परस्परांच्या विरूद यावल पोलीसात फिर्याद दाखल केली आहे.

 या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की यावल तालुक्यातील साकळी या गावातील भोईवाडयात राहणारा गौरव पुरूषोत्तम माळी ( वय २५ वर्ष ) याने याच परिसरात राहणार्‍या एक महीला ही सायंकाळी १९ वाजेच्या सुमारास आपल्या घरासमोर धोतलेल्या तांदुळाचे पाणी फेकण्यास गेली असता तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले. या कारणा वरून महीलेने यावल पोलीसात फिर्याद दाखल केली.

दुसर्‍या एका फिर्यादीत गौरव पुरूषोत्तम माळी याने दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे की गावातील राहणारे सद्दाम रसुल पिंजारी, बाबा शाहरूख (रा. ग्रामपंचायत जवळ साकळी), तौसीफ गुलाम शेख (रा . अक्सानगर साकळी) , अल्लाउद्दीन शेख, आदील गॅरेजवाला व अल्तमश ईकबाल शेख (रा. भोईवाडा साकळी) यांनी फिर्यादीच्या घराचा दरवाजा तोडुन त्यास बेदम मारहाण केली असे नमूद केले असून यानुसार फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी या घटनेचा तपास करीत आहेत. तर या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, विभागीय पोलीस अधिकारी नरेन्द्र पिंगळे यांनी आज तात्काळ घटनास्थळी भेट देवुन परिस्थितीचा आढावा घेतला. गावातील सर्वधर्मीय समाज बांधवांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक साकळी ग्रामपंचायत कार्यालयात घेतली. 

नागरीकांनी कुठल्याही अफवांवर विश्‍वास न ठेवता गावातील शांतता व एकात्मता कायम राखावी असे आवाहन केले. शांतता समितीच्या बैठकीस जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण समिती सभापती रवीन्द्र सुर्यभान पाटील व आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

Exit mobile version