Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रेल्वे तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्या तरूणाला अटक

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  येथील रेल्वे आरक्षण कार्यालयाजवळ तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या एकाला भुसावळ रेल्वे पोलीसांनी आरक्षण कार्यालयाजवळ अटक केल्याची कारवाई बुधवारी ७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता केली आहे. त्यांच्याकडून एक तत्कालचे तिकीट जप्त करण्यात आले आहे.  जाहिद अली इकबाल अली सय्यद (वय ३४, रा. जाम मोहल्ला, भुसावळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

भुसावळ रेल्व स्टेशनजवळील आरक्षण कार्यालयाजवळ एक व्यक्त आरक्षण टिकिटांचा काळाबाजार करत असल्याची माहिती भुसावळ रेल्वे पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार  त्यानुसार उपनिरीक्षक पि.के. दीक्षित आणि जितेंद्र कुमार मिश्रा व त्यांच्या पथकाने दक्षिण बाजूच्या रेल्वे आरक्षण कार्यालयाजवळ बुधवारी ७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता तपासणी केली. तिथे खिडकी क्रमांक १ जवळ संशयित आरोपी जाहीद अली इकबाल अली सय्यद हा तिकीट काढून घाईघाईत जाताना त्यांना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली.  मात्र त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली.

त्याला संशयास्पद स्थितीत पोलीस स्टेशनला आणले. तेव्हा त्याच्याकडून एक तत्कालचे तिकीट मिळून आले आहे. कमिशन मिळण्याच्या आमिषाने लोकांकडून अधिक पैसे घेऊन एजंटगिरी करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक एन. के. सिंह करीत आहेत.

Exit mobile version